Ad will apear here
Next
‘आई कुठे काय करते’ : आईच्या भावविश्वाचा वेध घेणारी नवी मालिका

पुणे : व्यापता न येणारं अस्तित्व आणि मोजता न येणारं प्रेम म्हणजे आई. तिच्या निर्व्याज प्रेमाची परतफेड करणं अशक्य आहे. आपल्याआधी तिचा दिवस सुरू होतो. सर्वांच्या आवडी-निवडी, कामाच्या वेळा, थोरामोठ्यांची काळजी आणि घर जपताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे विसरते. तसं पाहिलं तर गृहिणीच्या कामाचं आणि तिच्या त्यागाचं कोणतंही मोल नसतं. घरातला प्रत्येकजण तिला गृहीत धरत असतो. 

एकाचवेळी आई, सून, मुलगी, पत्नी, वहिनी अशा अनेक जबाबदाऱ्या ती कोणतीही तक्रार न करता पार पाडत असते. तिच्या कामाचा मोबदला सोडाच; पण साधं कौतुकही तिच्या वाट्याला येत नाही. घरासाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका स्टार प्रवाहवर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणार आहे.  

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली २५ वर्ष संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभाळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आई हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. या विषयावर मालिका करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे कारण आई आपल्यासाठी किती करते हे आपल्या ध्यानीमनीही नसतं. आपल्या आयुष्यातली ही सर्वात महत्त्वाची व्यक्ती जी आपल्यासाठी खूप काही करते पण त्याची जाणीव कधी करुन देत नाही. अशा या आईची गोष्ट मांडताना खूप अभिमान वाटतोय.’  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZOZCH
Similar Posts
६५व्या वर्षी मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता भगवान करेंची संघर्षगाथा चित्रपट रूपात पुणे : एखादी सामान्य व्यक्तीही रोजच्या जगण्याचा संघर्ष करत असताना एखादी अफाट कामगिरी करून जाते आणि सारी दुनिया थक्क होते. अशीच एक प्रकाशझोतात आलेली व्यक्ती म्हणजे ६५ व्या वर्षी अनवाणी पायाने धावून बारामतीतील शरद मॅरेथॉन जिंकणाऱ्या लता करे. त्यांच्या आयुष्यावर ‘लता भगवान करे - एक संघर्षगाथा’ हा चित्रपट
‘आईचं समर्पण शब्दांत व्यक्त करणं केवळ अशक्य’ ‘स्टार प्रवाह’वर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर अरुंधतीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आईच्या भावविश्वाचा शोध घेणाऱ्या या भूमिकेविषयी मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
अमेरिकन सरोदवादक केन झुकरमन यांनी उलगडली कारकीर्द पुणे : गिटार वाजवत असताना आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा गंधही नसताना सरोदने घातलेली भुरळ, प्रथम सतार शिकण्यास केलेली सुरुवात आणि पुन्हा सरोदच्या शिक्षणाकडे वळलेले पाय आणि सरोदलाच वाहून घेण्याचा मनाने घेतलेला निर्णय… अमेरिकेतील प्रख्यात सरोदवादक केन झुकरमन यांनी आपला प्रवास ‘सवाई’च्या ‘अंतरंग’ कार्यक्रमात उलगडला
दीपाली पानसरे करतेय कमबॅक मुंबई : देवयानी या मालिकेतून रसिकांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री दीपाली पानसरे तब्बल पाच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ‘स्टार प्रवाह’वर २३ डिसेंबरपासून सायंकाळी ७.३० वाजता सुरू होणाऱ्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language